ताज्या बातम्यामहाराष्ट्र

के.डी.सी. निवडणूक : कोल्हापूर जिल्हा बँकेची रणधुमाळी ऑक्टोबरमध्ये ?

कोल्हापूर प्रतिनिधी :

कोल्हापूर बँकेची निवडणूक रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांवर असलेली स्थगिती शासनाने उठवली आहे. तसेच मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून येत्या दोन दिवसांत आदेश काढण्याची शक्यता आहे.त्यानंतर मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसाचा अवधी लागेल, अशी शक्यता आहे. यावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks