ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल : राही सोशल फाऊंडेशनच्या वतीने पतंग महोत्सवाचे आयोजन

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल येथील गहिनीनाथनगरजवळ पतंग महोत्सव संपन्न झाला. राही सोशल फाऊंडेशन याच्या वतीने या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 4 थे वर्ष हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात अनेक पालकांनी आपल्या मुलांसह सहभाग घेत आनंद लुटला.
यावेळी पैलवान बाबा राजेमहाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘येताना दोरा व रिंगी घेऊन या, पतंग आम्ही देऊ, सूतही बांधून देवू’ असे आवाहन या उपक्रमांतर्गत करण्यात आले होते. त्यानुसार मोठ्या संख्येने मुले, मुली व त्यांचे पालक आदींसह पतंगप्रेमी कुटूंबे सहभागी झाली होती. काही विदेशी पतंग या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवण्यात आले होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित मोरबाळे, सचिन ढेरे, अविनाश चव्हाण, सुनील कालेकर चंद्रकांत पसारे आदींनी परिश्रम घेतले.