जीवनमंत्रतंत्रज्ञानताज्या बातम्या

फक्त एक मिस कॉल दया आणी EPFO मध्ये आत्तापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम माहिती करून घ्या.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

प्रत्येक महिन्याला आपल्या पगारातून काही पैसे भविष्य निर्वाह निधीत जमा होते. मात्र आपल्याला जमा होणारी आणि आत्तापर्यंत जमा झालेली एकूण रक्कम माहिती नसते. मात्र आता ही रक्क्म आपल्याला सहज बघता येणारे आहे.

तुम्हाला EPFOकडे नोंदणी असलेल्या तुमच्या मोबाईलवरुन 011-22901406 या क्रमांकावर मिस्डकॉल द्यावा लागेल. त्यानंतर EPFO कडून तुम्हाला एक मेसेज पाठवला जाईल. त्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याचा क्रमांक, नाव, जन्मतारीख, ईपीएफ बॅलन्स आणि एकूण जमा रक्कम अशी सगळी माहिती असेल.

गेल्या अनेक दिवसांपासून नोकरदारांचे डोळे लागून राहिलेले पीएफवरील व्याजाचे पैसे अखेर त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. हे पैसे ऑगस्ट महिन्यात नोकरदारांच्या खात्यात जमा होतील, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 ऑगस्टला हे पैसे नोकरदारांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या कोरोना संकटामुळे अनेकांची आर्थिक अवस्था बिकट झाल्याने भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात EPFO ने कर्मचाऱ्यांना एक नवी सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे तुम्ही आता आजारपणाच्यावेळी गरज लागल्यास PF खात्यामधून आगाऊ रक्कम काढू शकता. विशेष म्हणजे यासाठी रुग्णालयाचे बिलही सादर करण्याची गरज नाही.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks