मोठी बातमी : ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची परवानगी

NIKAL WEB TEAM :
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे. त्यानुसार आता राज्यभरातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिलेली आहे.
करोना नियमांचे पालन करून शाळा सुरू केल्या जात आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर, शाळा सुरू कधी होणार? याबाबतची प्रतीक्षा आता संपलेली आहे. तर, ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होणार असल्याच्या वृत्ताला शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना दुजोरा दिलेला आहे.
शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्तांच्या, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत स्तरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याच्या, शिक्षकांचे लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.