ताज्या बातम्यामहाराष्ट्र

दगडापासून तयार होणाऱ्या वस्तू अजूनही ठरताहेत घरोघरी वरदान ; कलाकुसर अजूनही जिवंत

कुडूत्री:सुभाष चौगले

या धक्काधक्कीच्या व आधुनिक यंत्राच्या जमान्यात वेगवेगळी लाईट वरील साधने आली असली तरी पूर्वीपासून घरामध्ये लागणारी दगडापासून बनवली जाणारी साधने बनवण्याची कला लिलया अजूनही जिवंत आहे.यासाठी पाथरवट व्यवसाय रस्त्या रस्त्यावर आपल्या नाजूक कलेने अनेक वस्तूंना जन्म देताना पहायला मिळत आहेत.
परंपरागत आणि पूर्वीपास चालत आलेला हा दगडापासून तयार होणाऱ्या वस्तूंचा व्यवसाय जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे.दगडापासून तयार होणाऱ्या सुबक आणि आकर्षक वस्तू त्यामध्ये जाते, पाटा,वरवंटा,खलबते,घरासाठी लागणाऱ्या चौकट,मिरची ठेवचण्यासाठी लागणारे वाण देवदेवतांच्या मूर्ती, आदी साहित्य बनवले जाते.
अगदी जुन्या काळापासून या वस्तू घरात वापरल्या जातात.आधुनिक व यांत्रिक साधनांनी जरी जन्म घेतला असला तरी याचा काही या साधनांवर म्हणावा तसा परिणाम झाला नाही. आजही सणवार,उत्सव यासाठी यातील काही साधनाचा वापर अजूनही होतोय.आजही काही महिला दगडापासून तयार होणाऱ्या वस्तू या आजही गावात देताना पहायला मिळत आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या दगडांची उपलब्धता करावी लागते.
या वस्तू तयार करायचे म्हंटले की शरिरीक कष्ट आले.त्यासाठी मुबलक वेळ ही द्यावा लागतो.अगदी कलाकुसर तसेच दिसायला सुंदर दिसणाऱ्या वस्तू आजही आधुनिक जगाचे लक्ष वेधून घेत आहेत.

वीज नसताना . . 

घरामध्ये लाईट नसताना सणवार ,उत्सव ,किवा मसालेदार जेवणासाठी दगडापासून तयार होणाऱ्या वस्तूंचा आधार घरोघरी घ्यावा लागतो.या वेळी विजेवरील साधने उपयोगी ठरत नाहीत.

जुनं ते सोनं . . .

जुनं ते सोनं असते हे दगडा पासून उपयोगी पडणाऱ्या वस्तूंच्या मुळे आपल्याला निश्चितच जाणवते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks