बांधकाम कामगारांना मिळणार संसार उपयोगी भांड्याचा संच : महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना भुदरगड तालुकाध्यक्ष धनाजी गुरव यांची पत्रकाद्वारे माहिती.

गारगोटी प्रतिनिधी : उदय कांबळे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा संसार सट मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष धनाजी गुरव यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन व महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे वतीने बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर 10 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील नोंदणी नूतनीकरण व विविध लाभ संदर्भात मंडळाकडे तक्रारी सुरू होते. यासंदर्भात व प्रलंबित नविन घोषणा या संदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांच्या वतीने फेडरेशन व मंडळाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक मुख्य कार्यालय मुंबई येथे लावली होती.

या बैठकीत जिल्हा अध्यक्ष कॉ आनंदा गुरव, धनाजी गुरव व राज्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये भांड्यांच्या सटा विषयी धोरण स्पष्ट करा असे संघटनेच्या वतीने प्रश्न लावून धरले नंतर सदर भांड्यांच्या सटांचा प्रश्न तातडीने मार्गी लागला आहे.
तरी नोंदीत बांधकाम कामगारांनी यांचा ताबडतोब लाभ घ्यावा कारण पुढे आचारसंहिता लवकरच लागणार असलेने वाटप थांबणार आहे. असे पत्रक महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी काढले.