क्रीडाताज्या बातम्याभारत
#IPL_2022 : मोठी बातमी..! के.एल. राहुल सोडणार पंजाबचा संघ?

टीम ऑनलाइन:
पंजाब किंग्जचा कप्तान केएल राहुलबाबत मोठी बातमी समोर आली आहे. राहुल या फ्रेंचायझीपासून वेगळा होणार असल्याचे वृत्त आहे. लिलावात त्याच्यावर जोरदार बोली लागण्याची शक्यता आहे.
२०१८ पासून राहुल पंजाब किंग्जसाठी चांगली कामगिरी करत आहे. मात्र, या काळात त्याला संघाचे जेतेपद मिळवता आले नाही.
अनेक फ्रेंचायझींनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे, जर राहुल पंजाबपासून वेगळा झाला, तर त्याला लिलावात मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.