मजरे शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सदस्यांवर कारवाईचे निर्देश

चंदगड प्रतिनिधी :
मजरे शिरगाव तालुका चंदगड येथील ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोग निधीतून प्राथमिक शाळा,अंगणवाडी साठी साहित्य खरेदी केले होते सदर साहित्य पुरावठ्यास एक वर्षाचा विलंब झाला असून अंगणवाडी फिल्टर साहित्य अंगणवाडी सेविकेच्या ताब्यात मिळाले नाही त्यामुळे तीन लाख 73 हजार 928 इतक्या रकमेची अनियमितता व 24 हजार 999 रुपये रकमेचा अपहार झालेने यासाठी ग्रामपंचायतीची पूर्ण कार्यकारिणी जबाबदार आहे तसेच अदकारी वसाहतीत विद्यमान सरपंच अंकिता अंकुश अदकारी,यांचे कुटुंबीयांनी 10 वर्षांपूर्वी घर बांधले आहे त्याचीही पंचायतीत नोंद नाही तसेच सरपंचाच्या घराकडे जाणारा व नोंद नसलेल्या रस्त्यावर 14 व्या वित्त आयोगातून 1 लाख 54 हजार 756 इतका खर्च झाला आहे मात्र भ्रष्टाचार झाला नसला तरी रस्ता व घर याची नोंद कार्यकारिणीने पंचायतीत करून उत्पन्न वाढीकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे सरपंच सौ अंकिता आदकरी,उपसरपंच गोपाळ वाके ,सदस्य अंकुश गावडे,मलापा नाईक,सुरेश हासबे,विठोबा मुळीक ,सौ राजश्री गावडे,सौ दीपाली शिरगावकर,सौ स्वाती सूर्यवंशी,सौ राजश्री नाईक,सौ मंदा कांबळे,सौ रेणुका जाधव या सर्वांवर कर्तव्यात कसूर झालेने त्यांच्याविरुद्ध विभागीय आयुक्त पुणे यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत.