जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्या फंडातून शेणगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन; शेणगांवसाठी निधी कमी पडू देणार नाही : जीवनदादा पाटील

गारगोटी प्रतिनिधी :
आकुर्डे जिल्हा परिषद मतदार संघाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांच्या फंडातून विशेष प्रयत्नातून शेणगांव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन शनिवार दिनांक ३० ऑक्टोबर रोजी शेणगांव येथे संपन्न झाले.
शेणगांव गावातील कुंभार गल्ली साठी पेविंग ब्लॉक बसविणे, चाटे गल्लीतील महालक्ष्मी मंदिर सुशोभिकरण करण्यासाठी सुमारे एक लाखाचा निधी, महादेव मंदिर साठी सामाजिक हॉल व पेविंग ब्लॉक अशा विविध विकास कामांचा शुभारंभ कुदळ मारून व श्रीफळ वाढवून जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी कुंभार गल्ली मध्ये ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार यांच्या माध्यमातून सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शेणगांवचे लोकनियुक्त सरपंच सुरेशदादा नाईक उपस्थित होते.
उपस्थित सभेला संबोधित करताना ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार यांनी जीवन दादांचे आभार मानताना येणाऱ्या पुढील निवडणुकीमध्ये संपूर्ण कुंभार समाजासह मी स्वतः आपल्या सोबत असेल, अशी ग्वाही दिली.
कुंभार समाज व संत गोरा कुंभार तरुण मंडळ यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील यांचा कुंभार गल्ली साठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांनी येणाऱ्या काही दिवसात शेणगाव गावासाठी आणखीन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊ तसेच पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या माध्यमातून देखील शेणगांव साठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
बचत गटांच्या महिलांकडून जीवन दादांचा विशेष सत्कार…
आयोजित कार्यक्रमाला महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींकडून जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांचा फेटा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतरच्या भाषणात जीवन दादा पाटील यांनी गावातील प्रत्येक महिला बचत गटांसाठी जमखाना (जाजम) उपलब्ध करून देणार असल्याचे महिलांना सांगताच मोठ्या टाळ्यांच्या गजरात महिलांकडून दादांचे स्वागत करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात लोकनियुक्त सरपंच सुरेशदादा नाईक यांनी जीवन पाटील यांनी आजपर्यंत दिलेल्या निधीचे उल्लेख करत जिल्हा परिषद सदस्य जीवनाचा पाटील यांचे आभार मानले व येणाऱ्या काळात प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली.
भैरवनाथ कुंभार व सुनील तेली यांचे विशेष कौतुक…
जीवन दादांकडून हा निधी आणण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ कुंभार व युवक नेते सुनील तेली यांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल बोलताना माजी उपसरपंच रघुनाथ कुंभार व तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष गणपतराव जाधव यांनी या दोन युवक कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी चोडणकर अण्णा, बाळासो तेली, सुभाष सनगर, माजी उपसरपंच अरविंद कुंभार, सुनील कोरे, नंदकुमार ढोबळे, सदानंद आमणगी, प्रकाश जाबशेट्टी, विश्वनाथ कुंभार, अवधूत विभूते, विष्णू कुंभार, एकनाथ कुंभार, भिकाजी कुंभार, दशरथ कुंभार, केरबा कुंभार, डॉक्टर शामराव कुंभार, रमेश विभूते, समीर आमणगी, प्रवीण कुंभार, आशिष कुंभार, भास्कर कुंभार, सागर कुंभार, नामदेव कुंभार, धोंडीराम कुंभार, दीपक कुंभार, संत गोरा कुंभार तरुण मंडळाचे अध्यक्ष नितीन कुंभार व मंडळाचे कार्यकर्ते कुंभार समाज व परिसरातील महिला बचत गटांच्या प्रतिनिधी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कोरे यांनी केले तर आभार संजय जाधव सर यांनी मानले.