खो- खो पट्टू अपेक्षा सुतार होन्याळीचा लौकिक देशभर पोहोचवेल : आमदार हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन ; श्री. शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराबद्दल केला घरी जाऊन सत्कार

प्रतिनिधी : विजय मोरबाळे
खो- खो पट्टू अपेक्षा सुतार होन्याळी गावाचा नावलौकिक देशभर पोहोचवेल, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. होन्याळी ता. आजरा येथील कु. अपेक्षा अनिल सुतार हिला यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार श्री. शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल आमदार हसन मुश्रीफ यांनी घरी जाऊन तिचा सत्कार केला. होन्याळी गावाची कन्या असलेली कु. अपेक्षा ही महाराष्ट्र खो-खो संघाची कर्णधार आहे.
यावेळी आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, शासनामार्फत जी मदत लागेल त्यासाठी आपण या विभागाचा आमदार म्हणून प्रयत्न करू. अपेक्षाला यापूर्वी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये वीसहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. या मिळालेल्या पुरस्काराबद्दल अपेक्षा हिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथआण्णा तेली, उत्तूर राष्ट्रवादीचे प्रमुख वसंतराव धुरे, मारुतराव घोरपडे, शिरीषभाऊ देसाई, विजयराव वांगणेकर, राजू पाटील, संजय पवार , महेंद्र देऊसकर, संभाजीराव पाटील, विनायक तेली, सोमनाथ बिरंबोळे, अशोक लकांबळे, संतोष लकांबळे, श्रीधर देऊसकर, जोतिबा मुळीक, सागर सरोळकर, प्रवीण पाटील, अपेक्षाचे वडील अनिल सुतार व कुटुंबीय उपस्थित होते.