राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नूतन वास्तूचे उदघाटन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या शुभहस्ते व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थित झाले

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज कोल्हापुरातील राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या नूतन वास्तूचे उदघाटन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपेजी यांच्या शुभहस्ते व श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थतीमध्ये करण्यात आले.
राजश्री शाहू ब्लड सेंटरच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच आसपासच्या अनेक जिल्ह्यांतील लोकांची रक्ताची मोठी गरज पूर्ण झाली आहे. कोल्हापुरात ब्लड बँक म्हणजे शाहू ब्लड बँक असे अनेक वर्षापासूनचे समीकरण बनले आहे.
लोकांना सेवा देत असताना या सेंटरने नेहमीच सामाजिक दायित्व जपण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. त्यामुळे रक्त हवे आहे असे सांगणारे जेवढे लोक आहेत किंबहुना त्यांच्या पेक्षा जास्त लोक रक्तदान करण्यासाठी या सेंटरकडे येत असतात.
काळाची पावले ओळखून या ब्लड सेंटरने अनेक वेगळ्या प्रकारचे अत्याधुनिक मशिन्स उपलब्ध केले आहेत. त्यामुळे अधिक दर्जेदार आणि आधुनिक सेवा देण्यात आपण नेहमीच कार्यरत आहे. या पुढील काळातही राजर्षी शाहू ब्लड सेंटरच्या माध्यमातून लोकांची अशीच सेवा व्हावी, हीच अंबाबाई चरणी प्रार्थना.
यावेळी,आमदार ऋतुराज पाटील,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सीईओ संजयसिंह चव्हाण, रोटरी समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशिंगे, महेंद्र परमार आड उपस्थित होते.