मंत्री हसन मुश्रीफ यांचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले अभिनंदन ; कागलच्या विश्रामगृहात प्रमुख कार्यकर्त्यांसह घेतली भेट

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांची माजी आमदार के. पी. पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत भेट घेऊन अभिनंदन केले. माजी आमदार श्री.पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत मंत्री श्री.मुश्रीफ यांची कागलच्या विश्रामगृहामध्ये भेट घेतली.
या भेटीदरम्यान बिद्री साखर कारखान्याच्या विकासात्मक वाटचालीमध्ये असलेल्या विविध अडचणी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यामध्ये कारखान्याचा इथेनॉल प्रकल्पासह विविध विषयांवर चर्चा झाली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक रणजीतसिंह पाटील, हुतात्मा स्वामी वारके सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष पंडितराव केणे, बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई, उमेशआण्णा भोईटे, राजेंद्र पाटील – सरवडेकर, विश्वनाथ कुंभार, सुनील कांबळे, गोकुळचे माजी संचालक विलास कांबळे, धोंडीराम वारके आदी प्रमुख उपस्थित होते.