मंडलिक महाविद्यालयाने घेतली जागतिक सागर दिनानिमित्त ‘पाणी वाचवा’ शपथ

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये सध्या विविध उपक्रमांची नांदी सुरु आहे. अभ्यासक्रमासोबत अभ्यासेतर उपक्रमही उत्साहात घेतले जातात. सध्या भारत सरकारद्वारे ‘आजादी का अमृत महोत्सव’ विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), पर्यावरण संसाधन केंद्र (इआरसी) व राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांनी संयुक्त विद्यमाने आज रोजी ‘जागतिक सागर दिन’ प्रसंगी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद व प्रशासकीय कर्मचारी यांच्या समवेत पाणी वाचवण्याबाबत आणि पाणी वापरासंबंधी कुटुंबीय, मित्र परिवार व नातेवाईकांना त्याबद्दल महत्व सांगण्याबद्दल शपथ ग्रहण केली.
याप्रसंगी इआरसीचे समन्वयक प्रा. दादासाहेब सरदेसाई यांनी प्रास्ताविकामध्ये उपस्थितांना सागर दिनाचे महत्व पटवून सांगितले. एनसीसीचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी उपस्थितांना शपथ दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. डी. कुंभार व उपप्रायार्च डॉ. टी.एम. पाटील यांनी सर्वांना शपथ कृतीत उतरविण्याचे आवाहन केले.
त्यानंतर एनसीसीचे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. ए. डी. जोशी व प्रा. डॉ. एम. ए. कोळी यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी कॉमर्स विभागप्रमुख प्रा. डॉ. यु. आर. शिंदे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अ.जी. मगदूम व प्रा. डॉ. के. एस. पवार, मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. एम. होडगे, हिंदी विभागाचे प्रा. डॉ. एच. एम. सोहनी यांच्या समवेत महाविद्यालयाचा इतर स्टाफही उपस्थित होता.



