महागाईच्या काळात महिलांनी स्वयं रोजगारावर भर द्यावा : प्रितम कांदळकर
कुडूत्री प्रतिनिधी :
आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी स्वयं रोजगार या वर भर ठेवावा व आपली आर्थिक उन्नती साधावी.त्यासाठी पडेल ते कष्ट सोसण्याची जिद्द ठेवावी असे मत अध्यक्षा प्रितम कांदळकर यांनी. अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या मार्गदर्शनातू जिव्हाळा महिला स्वयंसहायता बचत गट यांनी आयोजित केलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून स्वयं रोजगार शिबिर प्रसंगी व्यक्त केले.
सौ. कांदळकर पुढे म्हणाल्या “आज काल महागाई एवढी वाढली आहे.की सर्व सामान्य माणसांना आपला चरितार्थ चालवणे कठीण झाले.महिलांनी या महागाईच्या जमान्यात छोटे मोठे लघू उद्योग सांभाळून आपली प्रगती साधली पाहिजे. तरच आलेल्या परिस्थितीशी दोन हात करता येतील.
शिबिरात अनेक गृह उपयोगी वस्तूंचे प्रदर्शन भरवले होते. या वेळी मैत्री बचत गटाच्या अध्यक्षा सारिका कदम यांनी उपस्थित महिलांना काही टिप्स दिल्या.या सर्व महिला बचत गटांना अनंत शांतीच्या अध्यक्षा सौ.माधुरी खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या वेळी जिव्हाळा बचत गटाच्या सचिव सुशिला मगर,आरती जाधव,रेश्मा यादव, लिना उगादे, भाग्यश्री पाटील,निशा शाह, एकता निकम,माऊली बचत गटाच्या अध्यक्षा दिपाली तेलंग आदी महिला उपस्थित होत्या.