मंडलिक महाविद्यालयात ग्रीटिंग स्पर्धेत विद्यार्थिनींनी केला कलेचा वर्षाव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात ‘ग्रीटिंग बनाओ, छा जाओ’ ही अनोखी स्पर्धा नुकतीच पार पडली. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी भाषेत विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करता याव्यात आणि इंग्रजी भाषेबद्दल माहिती, प्रेम व आवड त्यांच्या मनात वाढावी या हेतूने महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी ही स्पर्धा आयोजित केली. मोबाईलच्या युगात हरवलेल्या पिढीला स्वतःच्या कलेची ओळख यानिमित्ताने व्हावी हा ही या स्पर्धेमागचा हेतू होता. यामध्ये ऑनलाईन नोंदणी द्वारे आर्टस्, कॉमर्स, सायन्स व बी सी ए विभागामधून तब्बल 90 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टाकाऊ पासून टिकाऊ पध्दतीने, तसेच कमी खर्चात दर्जेदार व आकर्षक ग्रीटिंग बनवली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अर्जुन कुंभार यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी संयोजकाचे या अभिनव स्पर्धेबद्दल अभिनंदन केले आणि सर्व सहभागी स्पर्धकांना त्यांनी बनवलेल्या ग्रीटिंग मधील त्यांच्या क्रिएटिव्हिटीबद्दल, कल्पकता आणि आकर्षकपणा याबद्दल भरभरून कौतुक केले. अशाच स्पर्धेमधून उद्याचे उद्योजक व कलाकार घडत असतात याची जाणिव करून दिली. याप्रसंगी सूत्रसंचलन आयोजक प्रा. प्रधान यांनी केले. प्रा. जयसिंग कांबळे, प्रा. सौ. शीतल मोरबाळे व प्रा. कु. तृप्ती गवाणकर यांनी परिक्षक म्हणून काम केले. ग्रंथपाल प्रा. टी. एच. सातपुते, प्रा. संजय हेरवाडे, प्रा. स्वप्नील मेंडके, प्रा. एस एस मांगले या सर्वांचे यासाठी विशेष सहकार्य लाभले. पुढील स्पर्धक यामध्ये विजेते ठरले: प्रथम- कु. श्रद्धा अनिल सुतार (B.COM.III); द्वितीय- कु. प्रांजल शिवाजी चौगले (B.COM.I); तृतीय- कु. वैष्णवी नेताजी अस्वले (B.COM. I); चतुर्थ- कु. अश्विनी सयाजीराव तिळवे B.A. III; पंचम- कु. सुप्रिया राजेंद्र कळमकर (B.COM.I)