ताज्या बातम्या

भुदरगड तालुक्याला बी.डी.पाटील फौंडेशन तर्फे रुग्णवाहिक अर्पण

पाटगाव : समीर मकानदार

“पश्चिम भुदरगड मधील रुग्णांची योग्य गरज ओळखून या भागातील लोकांसाठी बी.डी.पाटील फौंडेशन, बशाचामोळा यांनी रुग्णवाहिका लोकार्पण करून केलेली मदत खूप मोलाची आहे” असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते प्राथमिक आरोग्य केंद्र कडगांव येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मा.के.जी नांदेकर होते.

“बशाचामोळा येथील युवा उद्योजक डॉ.बाळकृष्ण दत्तात्रय पाटील यांनी आपल्या बिपिन मरिन सर्व्हिसेस या उद्योग समूहाच्या माध्यमातून मोठी भरारी घेत जवळपास 3500 तरुणांना रोजगार उपलब्ध करून देत युवकांसमोर मोठा आदर्श निर्माण केल्याचे मत के.जी.नांदेकर यांनी व्यक्त केले.

बी.डी.पाटील फौंडेशन या समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून भुदरगड तालुक्यात विविध क्षेत्रात काम करण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या या संस्थेने पश्चिम भुदरगड मध्ये असणारी रुग्णवाहिकेची वाणवा ओळखून या भागासाठी आपले वडील कै.दत्तात्रय आबा पाटील यांचे स्मरणार्थ रुग्णवाहिका देऊन आपल्या कामाचा शुभारंभ केला. तसेच भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस उद्योजक डॉ.बी.डी.पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, बिद्रीचे संचालक धनाजीराव देसाई, मा.सभापती बाबा नांदेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मा.सभापती कीर्ती देसाई, मा.सभापती पांडुरंग पाटील, संदीप वरंडेकर, संग्राम सावंत, गणेश देसाई, संजय चव्हाण, शेखर पोतदार, चंद्रकांत पवार, श्रीकांत हावळ, संजय पाटील, नंदकुमार पाटील, वसंत पाटील, जयसिंग पाटील, आनंदा ढोकरे, संतोष संकपाळ, अलबर्ट पिंटो, प्रकाश सांडूगडे, संतोष भोसले, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई, गजानन देसाई, शशिकांत पाटील, आप्पा वरंडेकर ,जयसिंग मांगले, अक्षय पाटील, नामदेव पाटील, दत्तात्रय झाटे, अनिरुद्ध पाटील, यशवंत पाटील, बसत्याव भुतेलो, जे.आर.डिसोजा, अमोल पाटील, विलास राणे, विलास पाटील, शिवाजी पाटील, दत्तात्रय संकपाळ, सुनील पाटील, पांडुरंग पाटील, मारुती पोवार, मारुती संकपाळ, विराज पोवार, प्रताप पाटील, एम.आर.पाटील, विनायक गोरे, मधुकर कदम, संतोष सावंत, भैरवनाथ राणे, अंकुश पाटील, बाजीराव ढोकरे, विश्वास पाटील, बाबा पाटील, संजय किल्लेदार, विल्सन डिसोजा, संतोष पाटील, विश्वनाथ पाटील, प्रकाश तवटे, राजेंद्र देसाई, विकास गुजर, तानाजी डेळेकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे सचिव एकनाथ पाटील सर यांनी केले, तर बी.ए.पाटील यांनी आभार मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks