अखेर झुंझ अपयशी ; खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

पुणे :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार राजीव सातव यांचं दुर्दैवी निधन झालं आहे. राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. नुकतेच राजीव सातव यांच्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा व्हायरस सापडला असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांची गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी झुंज सुरू होती. 19 एप्रिल रोजी सातव यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. त्यानंतर 22 तारखेला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
पुण्यातील जहांगीर रुग्णालयात राजीव सातव यांच्यावर उपचार सुरू होते. 28 तारखेपासून राजीव सातव व्हेंटिलेटरवर होते. तसेच ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती देखील काँग्रेसचे नेते आणि मंत्री विश्वजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.
तब्येतीत सुधारणा होत असताना अचानक कालपासून राजीव सातव यांची तब्येत अचानक बिघडू लागली आणि अखेर त्यांची कोरोनाशी होत असलेली झुंज अपयशी ठरली. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, राजीव सातव यांचे पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान काही वेळापूर्वीच दुर्दैवी निधन झालं आहे.