पावसाळा ऋतुमध्ये दुभत्या जनावरांना वाळकी वैरण साठवणीची कोल्हापूर जिल्ह्यात लगबग

सावरवाडी ( प्रतिनिधी ) :
करवीर तालुक्यात शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे . दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांचे आर्थिक चलन चालते . पावसाळा ऋतूमध्ये दुभत्या जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मका वाळकी वैरण साठविण्याची ग्रामीण भागात सर्वत्र लगबग सुरू झाल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे .
शेतीमध्ये ऊसपीकामध्ये अंतर पीक म्हणून मका पीक घेतात . मोकळ्या शेतीमध्येही स्वतंत्र मका पिके घेतात . पावसाळा ऋतु मध्ये वाळकी वैरणीचा प्रश्न दुध उत्पादक शेतकऱ्यांना पडतो . ओल्या वैरणी बरोबर वाळकी वैरण दुभत्या जनावरांना पोषक ठरू लागल्याने मका, शाळू , गाजरी गवत, वाळवून त्याची कडबा कुट्टी तयार करून बॅगा भरून ठेवल्या जातात . मका पीकाची कसणे सोलणे , कडबा वाळविणे, मका पीक वाळविणे अशा कामांची लगबग ग्रामीण महिला वर्गाकडून सुरू आहे . मे महिण्यात वाळकी वैरण तयार करण्यात येत आहे.
वाळलेला मका पीक खरेदीसाठी मेंढपाळ व्यवसायीकाची झुंबड उडू लागली आहे .शंभर रूपये पायली या दराने वाळलेला मका शेळ्या मेढ्यांना खाद्य म्हणून पावसाळा ऋतूसाठी वापरण्यात येते असेही मेंढपाळ व्यवसायीकीनी प्रसारमाध्यमा शी बोलतांना सांगितले.