गोकुळमध्ये एकीचे बळ ठरले लै-भारी

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
जिल्ह्यासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ निवडणुकीचा निकाल विरोधी आघाडीच्या बाजूने लागला आणि विरोधी आघाडी सत्ता मिळवण्यात यशस्वी झाले. सत्तेवरून सत्ताधाऱ्यांना खेचण्याचा प्रयत्न मात्र विरोधी आघाडीचा यशस्वी ठरला.२१पैकी १७ जागा मिळवण्यात सतेज पाटील हसन मुश्रीफ ही जोडगळ यशस्वी ठरली.
गोकुळच्या राजकारणात गेल्या एक महिन्यापासून चांगलाच जोश आला.होता.दोन्हीही आघाडीकडून निवडणूक लढवण्याची पुरेपूर जय्यत तयारी झाली होती.ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा दोन्ही बाजूने निर्धार करण्यात आला होता. जिल्ह्यातील अनेक मंत्री,खासदार,आमदार.तसेच आजी मंत्री,आमदार,इतर नेते यांना एकत्र आणून सतेज पाटील यांनी कडवे आणि मोठे आव्हान निर्माण केले होते.ठराव धारक आणि मिळणारे कार्यकर्ते आपल्या पासून सत्ताधारी आघाडीत जाऊ नये याची खबरदारी पूर्णपणे मंत्री पाटील यांनी घेतली.
गोकुळची ही निवडणूक प्रचारातून ही चांगलीच गाजली.अगदी एकमेकावर टिका टिपणी करण्याची एकही संधी सत्ताधारी आघाडीने व विरोधी आघाडीने सोडली नाही.टिका करण्यात व तोंडसुख घेण्यात विरोधी आघाडीने सत्ताधारी आघडीने वर्चस्व मिळवले.पण सत्ताधारी आघाडीने या टिका मनावर न घेता आपण गोकुळ संघाचे व दूध उत्पादक सभासदांचे आपण हित कसे जोपासले असल्याचे सत्ताधारी आघाडीने वारंवार आपल्या प्रचारातून चित्रित केले.पण याचा काही उपयोग झाला नाही.विरोधी आघाडीने मल्टीस्टेट हा मुद्दा उचलून धरत प्रचारात आणला आणि हाच मुद्दा ठराव धारक मतदार यांच्या मनात घर करून गेला.
सर्व बाजूने विरोधी आघाडीने सत्ताधारी आघाडीला कोंडीत पकडले काल झालेल्या निकालात २१ पैकी १७ उमेदवारांना जिंकवण्यात विरोधी आघाडी सरस ठरली.असे असले तरी दोन्ही बाजूकडून टोकाचा संघर्ष या निवडणुकी पहायला मिळाला हे नक्कीच.
महाडिक व पी. एन यांच्या विरोधात सर्वजण एकत्र…
महाडिक व पी.एन.पाटील यांना शह देण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय सर्व मंडळी एकत्र झाली होती.कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची असा सर्वांच्या वतीने चंग बांधण्यात आला होता.तो खरा करून दाखवला.