ताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीवनात सुख हवे असल्यास मनुष्याने पंढरपूरला जावे :हभप विठल फड

नेसरी प्रतिनिधी-: पुंडलिक सुतार

मनुष्याला जीवनात सुखाची प्राप्ती हवी असल्यास एकदा तरी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घ्यावे असे प्रबोधन ह भ प विठ्ठल फड यांनी ह भ प जोतिबा जाधव केंचेवाडी यांनी महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या कीर्तन सांगताना केले गेले दोन दिवस केंचेवाडी,सातवणे व परिसरातील भजनी मंडळांनी भजने सादर केली तर चंदगड येथील पांडुरंग गोंधळी यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण हरिपाठ महिला मंडळ व पुंडलिक सुतार व सौ ताई यांच्या मार्गदर्शनाखाली दुंडगे येथील मुलींनी हरिपाठ सादर केला काला कीर्तन झालेनंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी वीज वितरणाचे कोल्हापूर विभागाचे मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे,संजय पोवार कार्य अभियंता गड , ए के राऊत उपव्यस्थापक गड,विशाल लोधे उप कार्य अभियंता गड ,श्रुती सूर्यवंशी,सुजाता खडके,हडपद शाखा अभियंता चंदगड यांचेसह विलास जाधव,अक्षय जाधव,महेश चिरमुरीकर यांचेसह भाविक उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks