ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद व राजर्षी छत्रपती शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी पोलिसांना होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप

नंदगाव प्रतिनिधी:
मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद व राजर्षी छत्रपती शाहू बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री मोहम्मद हसन शेख साहेब यांच्या सहकार्याने करोना साथीच्या युद्धात अग्रभागी लढणाऱ्या राधानगरी पोलिस स्टेशन च्या सर्व पोलिस कर्मचारी व होमगार्डना कोरोणा प्रतिबंधक होमिओपॅथिक औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पोलिस निरीक्षक श्री उदय डुबल साहेब, पोलीस कर्मचारी बजरंग पाटील प्रविण गुरव तसेच सर्व स्टाफ, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहम्मद यासीन शेख साहेब, जिल्हाध्यक्ष संजय शिंदे उपाध्यक्ष महेश नंदे, शमशुद्दीन जमादार जिल्हा राधानगरी तालुका अध्यक्ष याकूब बक्षू साहेब , सुभाष हुंदळकर उपस्थित होते.