ताज्या बातम्या
दिंडनेर्ली येथील कोरोना योद्धा म्हणून काम बजावलेल्या सर्वांना आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सुरक्षेसाठी वाफेचे मशीन देऊन सन्मान.

नंदगाव प्रतिनीधी :
दिंडनेर्ली (ता.करवीर) येथील कोविड काळामध्ये कोरोना योद्धा म्हणून काम बजावलेल्या आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी ,अंगणवाडी सेविका,मदतनिस, वायरमन अशा सर्व कर्मचाऱ्यांना दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून सुरक्षेसाठी वाफेचे मशीन देऊन सर्व कोरोणा योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा बाजार समितीचे संचालक दिगंबर पाटील, माजी सरपंच शांतिनाथ बोटे,संभाजी गणपती बोटे, सेवा सोसायटीचे संचालक संभाजी बोटे, कार्यकर्ते एन.के.पाटील, हंबीरराव वाडकर, भिकाजी वाडकर, अरविंद शिंदे, उमेश पाटील, सुहास पाटील, संदीप पाटील, रामचंद्र एकले,उदय भोसले, दीपक बोटे तसेच ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक काका पाटील,आरोग्य विभागाचे संजय नाईक,अमित नलगे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सुहास पाटील सर यांनी केले.