होळी लहान, पोळी दान ; शिवबा प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधालकी

राधानगरी प्रतिनिधी :प्रतिश पाटील
राशिवडे ता. राधानगरी येथील
एक उपक्रमशील मंडळ म्हणून शिवबा प्रतिष्ठान हे मंडळ सुपरिचित आहे . या उपक्रमाचा भाग म्हणून “शिवबा प्रतिष्ठान” मार्फत गत वर्षापासून होळीत आहुती पडणारी पोळी एखाद्या गरजू च्या मुखात पडावी या हेतूने होळी दिवशी पोळ्या जमा करून त्या निराधार, निराश्रित लोक असणाऱ्या ठिकाणी वितरित करण्याचे काम मंडळमार्फत कार्यकर्ते करीत असतात. गेल्या वर्षी गावातील सर्व मंडळांना पोळ्या जमा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला अभूतपर्व प्रतिसाद मिळाला. इतक्या पोळ्या जमल्या की त्या अनेक ठिकाणी देऊन सुद्धा संपत नव्हत्या अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी अगोदरच प्रा ए एस भागाजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजन करून मातोश्री वृद्धाश्रम कोल्हापूर या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यानी पोळ्या व दूध देऊन वृद्ध व्यक्ती समवेत हा सण आनंदाने साजरा केला.या उपक्रमास बिरदेव गणपती मंडळाचेही मोलाचे सहकार्य लाभले .
सणाचा आनंद सर्वांसोबत..
आंनदामध्ये सर्वाची सोबत..
यावेळी वृद्ध व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आपुलकी व समाधान पहावयास मिळाले . मातोश्री वृध्दाश्रमाचे शिवाजी पाटोळे , रोहन पाटोळे , प्रा ए एस् भागाजे , याबरोबरच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते . शेवटी रोहन पाटोळे यांनी आभार व्यक्त करत पुन्हा भेटण्याचे आवाहन केले .