विनाअनुदानित शाळेसाठी शिक्षकांची प्रलंबित निधीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयात धरणे आंदोलन; त्रुटी पूर्तता शाळांची यादी निधी तरतुदी सह तात्काळ घोषित करा.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
राज्यात कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या शाळांचा कायम शब्द काडले नंतर या शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. हे मूल्यांकन तालुका स्तरातील गटशिक्षणाधिकारी पासून ते मंत्रालयातील शिक्षण विभागात सचिव पातळीपर्यंत च्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येक टप्प्यावर या शाळांची तपासणी केली . यानंतर या शाळा अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्यात आल्या .अनेक प्राथमिक व माध्यमिक शाळांना २०टक्के अनुदान हे सुरू झाले. त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक शाळांची यादी दि . २८ फेब्रुवारी २०१८व दि .१३ सप्टेंबर २०१९ अनुदानास पात्र यादी घोषित केली. प्रत्यक्ष या उच्च माध्यमिक शाळांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी व २०टक्के अनुदान घेणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना पुढील वाढीव टप्पा देण्यासाठी पुन्हा या शाळांची फेर तपासणी करण्याचा निर्णय झाला.
त्यानुसार पूर्वी घोषित असणाऱ्या , २०% अनुदान सुरु असणाऱ्या शाळाची तपासणी करून दिनांक १२ फेब्रुवारी २ ०२१ , १५ फेब्रुवारी २०२१ व व २४ फेब्रुवारी २०२१ ला परत फेर यादी जाहीर करण्यात आली .यामध्ये पूर्वी घोषित केलेल्या , २०% अनुदान घेणाऱ्या अनेक शाळांच्या त्रुटी काढून त्या शाळा अपात्र करण्यात आल्या .पूर्वी या शाळा शालेय शिक्षण विभागाने तपासणी करूनच याद्या जाहीर झालेल्या होत्या .प्राथमिक माध्यमिक शाळांना २०टक्के पगार ही सुरू होतात .उच्च माध्यमिक शाळां अनुदानास पात्र म्हणूण घोषित केल्या होत्या . अश्या बऱ्याच शाळा फेर तपासणीत अपात्र केलेत. यामुळे शालेय शिक्षण विभागामध्ये , त्यामधील कर्मचाऱ्यांवरील असणारा भोंगळ कारभार शालेय शिक्षण विभागाने उघड केला.
पूर्वी झालेली तपासणी खोटी होती की नंतर ची तपासणी खोटी होती ? नेमकी बोगस तपासणी कोणती झाली ? याचा शोध शासनाने घेणे आवश्यक आहे . फेब्रुवारी २०२१ मध्ये शासन निर्णयात अपात्र ठरलेल्या शाळांना त्रुटी पूर्तता करण्यासाठी ३०दिवसांचा कालावधी दिलेला होता . या कालावधीत अनेक शाळांनी त्रुटींची पूर्तता केलेली आहे . यास जवळपास सहा ते सात महिने पूर्ण झालेत .अशा त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांची यादी शासनाकडून जाहीर झालेली नाही .अशा त्रुटी पूर्तता शाळांची यादी निधी तरतुदी सह तात्काळ घोषित करावी याकडे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला . पण अद्याप यादी घोषित न झाल्याने आज पासून या शिक्षकांनी रस्त्यावरील लढाई सुरू केले आहे .त्याचाच एक भाग म्हणून आज शासनाचे प्रतिनिधी या नात्याने मा . शिक्षण उपसंचालक ,कोल्हापूर विभाग कोल्हापूर या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले . तसेच या शाळांची यादी निधी तरतुदी सह 30 नोव्हेंबर पूर्वी घोषित न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .
मागण्या :
१) त्रुटी पूर्तता शाळाची यादी निधी तरतूदी सह तात्काळ घोषित कराव्यात .
२) संच मान्यतेच्या वेळी शाळा घोषित / अपात्र मुळे पदात बदल झालेल्या शिक्षकाना शालार्थ आय डी मिळावा .
३) कायम विनाअनुदानित कालावधीतील उच्च माध्यमिक शाळाच्या संचमान्यता दुरुस्ती शिबिराचे आयोजन करावे .
४) २०% अनुदान सुरु असणाऱ्या उच्च माध्य. शाळाना प्रचलीत धोरण लागू करूण पुढील टप्पा मिळावा .
आज या आंदोलनात राज्य सचिव प्रा. चंद्रकांत बागणे ,निमंत्रक संजय लष्करे ,विभागीय अध्यक्ष रत्नाकर माळी , सांगली जिल्हा अध्यक्ष जयसिंग जाधव ,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बाजीराव बर्गे ,भारत शिरगावकर रामचंद्र खुडे ,शरद माने पाटील ‘ संतोष कांबळे , विजयकुमार घुंगरे पाटील ‘ एकनाथ पाटील यांच्याबरोबर अनेक शिक्षक सहभागी झाले होते .