ताज्या बातम्या
पांडुरंग नगरी येथे श्री.विठ्ठल रखुमाई चे पुजन उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न.

कोल्हापुर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
फुलेवाडी रीगंरोड येथील पांडुरंग नगरी येथे मा.रोहीत कांबळे यांच्या घरी आषाढी एकादशी निमित्त
श्री.विठ्ठल रखुमाई चे पुजनसोहळा उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला.
मा.रोहीत कांबळे यांच्या घरी माऊलीची पुजा मा.किरण सिद्धाप्पा पाटील व सौ.वैशाली किरण पाटील यांच्या हस्ते पार पडली या वेळी परीसरातील भक्त मंडळीना खिचडी ,केळी, राजगिरी लाडु प्रसाद वाटप करण्यात आला.
या वेळी हरी पाटील, सतीश वर्मा, संजय पोवार, धनाजी तांबुळकर, प्रकाश चौगुले, अभिजित माने, इकबाल मुल्ला, दाकलू फोंडे, महेंद्र कांबळे, रोहीत कांबळे, सागर यादव, प्रकाश भोसले, देशपांडे, घोगले जेष्ठ नागरीक महिला उपस्थित होते.