उत्तरकार्याच्या खर्चाला फाटा देत कोविड केंद्रांना मदत; जगताप कुटुंबाचे उल्लेखनीय कार्य

कुडूत्री प्रतिनिधी :
कै. सौ. प्रेमला रामचंद्र जगताप. यांच्या स्मरणार्थ बाराव्याचा अनाठायी खर्च टाळून त्यांच्या परिवाराकडून कोल्हापूर येथील पाच कोविड केंद्राना जीवनावश्यक साहित्य भेट म्हणून दिले. आजकाल लोक मोठया प्रमाणात खर्च करून उत्तरकार्य करत असतात.पण आशा कार्यांच्या खर्चाला फाटा देत समाजासाठी पुढे येणारी व मदत करणारी लोकं तुरळक प्रमाणात आढळतात.
यावेळी अरुणराव रामचंद्र जगताप, श्री. विश्वजीत रामचंद्र जगताप, श्री. इंद्रजीत रामचंद्र जगताप, मुलगी सौ. छाया अशोकराव नलवडे, व नातु श्री.तुषार अरूणराव जगताप, श्री.निखिल विश्वजीत जगताप, श्री. सिध्देश इंद्रजीत जगताप, श्री.कपील अशोकराव नलवडे, श्री. तन्नमय अशोकराव नलवडे, व कु. प्रणित अरुणराव जगताप आदी उपस्थित होते.
जगताप कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत उद्दात भावनेतून केलेली मदत इतरांना प्रेरणा देणारी आहे.