पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद व खाशाबा जाधव यांना अभिवादन

कोल्हापुर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज २९ ऑगस्ट, राष्ट्रीय क्रीडा दिन. भारताच्या नव्हे तर जगाच्या क्रीडा इतिहासात हॉकीमध्ये आपल्या अजोड कामगिरीने, अप्रतिम कौशल्याने अढळ स्थान निर्माण करणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन. आज त्यांच्या जयंतीनिमित्त कोल्हापुरातील भवानी मंडप येथे ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव व मेजर ध्यानचंदजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हापूर क्रीडा विभागातर्फे भवानी मंडप ते हॉकी स्टेडीयम पर्यंत सकाळी” FIT INDIA MOVEMENT” अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी, विविध खेळात पदक प्राप्त खेळांडूचा सत्कार करण्यात आला.
कुस्ती ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पीयनशीप मध्ये सहभागी संग्राम पाटील, शुटींग खेळाडू समर्थ मंडलीक, योग पट्टु गार्गी भट, हॉकीचे पदक प्राप्त खेळाडू अनुष्का गुले,अस्था महाजन, प्रणव चौगले, यशराज पाटील, फ़ुटबॉलचे पदक प्राप्त खेळाडू प्रेम देसाई, अथर्व मोरे, देवेश सुतार, कुस्तीचे पदक प्राप्त खेळाडू संकेत पाटील, ओंकार पाटील, मैदानी खेळाचे पदक प्राप्त खेळाडून रोहन कांबळे, विकास खोडके, या खेळाडुंचा व आंतरराष्ट्रीय हॉकी पंच रमा पोतनीस, श्वेता पाटील यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
कलानगरी सोबतच क्रीडानगरी म्हणून ओळख असलेल्या आपल्या कोल्हापुरातील युवक-युवतीं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत चांगली कामगिरी करत आहेत. जिल्ह्यातील सर्व खेळातील खेळाडूंना जिल्ह्यामध्येच सर्व सोयी उपलब्ध करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील आहोत असं पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले.
यावेळी, आ.ऋतुराज पाटील, आ.चंद्रकांत जाधव, सौ.मधुरिमा राजे छत्रपती, क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रकांत साखरे, मोहन मांडवले, संभाजी पाटील, विजय सरदार, सुरेश गुरव, कोच अनिल परांडेकर, जिल्हा युवा केंद्राच्या पूजा सैनी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कुमार अगळगावकर, विकास माने, उदय पोवार, सुधाकर जमादार, अरूण पाटील, प्रवीण कोंढावळे, रविभूषण कूमठेकर, श्रीमती रोहीणी मोकाशी इतर कर्मचारी वाहतुक शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.