जीवनमंत्रतंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 4 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

Nikal Web Team : 

दहावीचा निकाल लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून उद्या निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.
बोर्डाच्या खालील अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच बारावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील

www.maharesult.nic.in

www.maharesult.nic.in

msbshse.co.in

hscresult.11thadmission.org.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in

बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर बारावीचे निकाल जाहीर करताना दहावी, अकरावी आणि बारावी या तिन्ही वर्गाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यासाठी 30 :30 :40 असा निकष राज्य मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे सरासरी गुण (30%),अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) आणि इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा ,सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) अशा प्रकारचे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर केले जाणार आहे

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks