ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : शेतकरी पुन्हा राजधानी दिल्लीच्या वेशीवर ; संसदेवर धडक देण्याचा निर्धार

संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यात वाढ आणि विकसित जमिनीच्या मागणीसाठी नोएडा आणि ग्रेटर नोएडातील शेतकरी संसदेवर धडक देण्यासाठी निघाले आहेत.शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारताच पोलिसांनी राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर वाहनांच्या तपासणीसाठी ठिकठिकाणी बॅरिकेड उभारल्यामुळे दिल्ली-नोएडा सीमेवर वाहतूककोंडी झाली.

शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी सर्व सज्जता केली असून,बुलडोझर, दंगलनियंत्रण वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत.नोएडातील शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी डिसेंबर २०२३पासूनच आंदोलन करत आहेत. परंतु, आता त्यांनी आपल्या मागण्यांसाठी संसदेवर धडक देण्याचा निर्धार केला आहे.तूर्तास तरी त्यांना नोएडातील महामाया उड्डाणपुलाजवळ रोखण्यात आले आहे. सद्य:स्थितीत उत्तर प्रदेश पोलिस शेतकऱ्यांशी चर्चा करत असून कदाचित ते दिल्लीत प्रवेश करणार नाहीत,अशी आशा दिल्लीच्या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

सध्या तरी या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा आणि दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेवर अभूतपूर्व कोंडी झाली आहे.दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेसह दिल्लीत प्रवेश करण्याच्या विविध मार्गांवरही सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निमलष्करी दलासह सुरक्षा दलालाही पाचारण करण्यात आले आहे. नोएडा आणि ग्रेटर नोएडातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गौतम बुद्ध नगर पोलिस ठाण्याने संचारबंदी लागू केली होती.तीन केंद्रीय मंत्री शेतकरी भेटीलाहमीभावासाठी आंदोलनाची हाक दिलेल्या शेतकरी नेत्यांशी तीन केंद्रीय मंत्र्यांनी चंडीगडमध्ये चर्चा केली. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व अर्जुन मुंडा यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान उपस्थित होते. पिकांच्या हमीभावाला कायदेशीर मान्यता मिळावी,या केंद्राच्या पूर्वीच्या आश्वासनाची पूर्तता व्हावी, अशी प्रमुख मागणी या शेतकऱ्यांनी १३ फेब्रुवारी २०२४ ला ‘दिल्ली चलो’, अशी हाक दिली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks