कोल्हापूर संभाजीनगर येथे सुतार-लोहार समाज वधुवर सुचक मेळाव्याचे 11फेब्रुवारी रोजी आयोजन

कळे -वार्ताहर अनिल सुतार
कोल्हापूर जिल्ह्यातील संभाजीनगर येथे सुतार लोहार समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवार दि ११ फेब्रुवारी रोजी सुतार-लोहार समाज वधुवर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुतार लोहार समाज बहुउद्देशीय संस्था संभाजी नगर कोल्हापूर यांचे मार्फत रविवार दि ११ फेब्रुवारी रोजी २४ वा वधुवर सुचक व समाज परिचय मेळावा आयोजित केला आहे.तसेच विधुर,विधवा व घटस्फोटित यांचीही नाव नोंदणी चालु आहे तरी या मेळाव्यास परिवारातील सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार समाज बांधव व मित्रमंडळींसह उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
मेळावा ठिकाण- इंदिरा सागर मंगल कार्यालय संभाजीनगर, पेट्रोल पंपाजवळ, रेस कोर्स नाका कोल्हापूर या ठिकाणी रविवार दिनांक 11 फेब्रुवारी सकाळी 10 ते 4 या वेळेत असणार असून कार्यक्रम स्थळी चहापान व भोजन व्यवस्था नाव नोंदणीसाठी संपर्क- ९३२५८३०७३८ ,९४२०५८३८५८ ,९८२२१२६४९० या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .