ताज्या बातम्यामहाराष्ट्र

सडोली खालसा येथे मूर्ती दान व निर्माल्य संकलन उपक्रमास चांगला प्रतिसाद

सावरवाडी प्रतिनिधी :

नद्यांचे प्रदुषण रोखणे व आरोग्यावर घातक परिणाम होऊन नये करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने गणेश मूर्ती दान व निर्माल्य संकलनास ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.  

सडोली खालसा सारख्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या गावात गणेशोत्सव काळात गणेशमुर्ती दान हा विचार बळावू लागला आहे . ग्रामस्थ तरूण मंडळांच्या पुढाकाराने नद्याप्रदुषण बाबत जनजागरण मोहिम राबविण्यात आली . मूर्ती विसर्जन साठी ग्रामपंचायत तर्फ चौकाचौकात  कुंड तयार केले होते.विसर्जनसाठी आलेल्या भाविकांचे ग्रामसेवक  पी एम भोपळे यांनी गणेशभक्तांचे  स्वागत केले.

यावेळी ग्रामस्थांना नदी प्रदूषणमुळे आरोग्यावर होणारे घातक परिणाम सांगितले  . कार्यक्रमात सरपंच अमित पाटील ,उपसरपंच  तेजस्विनी पाटील,पोलीस पाटील पंकजकुमार पवार पाटील, सदस्य जयसिंग कुंभार,विशाल गायकवाड,सागर चव्हाण,संजय पाटील ,सुनिल कांबळे,  शोभा कुंभार,  सुवर्णा पाटील,  ज्योती पाटील, स्त्री चळवळीच्या नेत्या  शैला कुरणे, सुनिता कुंभार , संगिता मगदूम, बाजीराव दिंडे व सर्व ग्रामस्थ, तरुण मंडळांचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks