महाराष्ट्रात किराणा दुकाने 7 ते 11 अशी 4 तासच खुली राहणार, विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संचारबंदी कडक होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

टीम ऑनलाईन :
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकार दुकानांच्या वेळेबाबत लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यातील किराणा मालकाची दुकाने फक्त ४ तास खुली ठेवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यात संचारबंदी असून सुद्धा लोकांची गर्दी वाढत आहे, विनाकारण लोकं किराणा मालाच्या नावाखाली फिरत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत किराणा मालाच्या दुकाने नियोजित वेळेनुसार खुली ठेवण्याचा निर्णय होणार आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांमुळे संचारबंदी कडक होणार असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी यावेळी दिले.
राजेश टोपे म्हणाले की, वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन जे काही छोटे जिल्हे किंवा दुर्गम भागातील जिल्हे असतील. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचा संपर्क रोज मंत्रालयाशी होत नाही. अशा ठिकाणी पालक सचिवांनी अधिक सक्रिय राहून काम केले पाहिजे. जे पालक सचिन ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नेमलेले असतील त्या सर्व पालक सचिवांनी सक्रियपणे काम करावे आणि आपापल्या जिल्ह्यातील संपूर्ण कोविड संदर्भात नियंत्रण ठेवावे. तसेच वाढत असलेली गर्दी आणि सध्या परिस्थिती पाहता ३० तारखेपर्यंत संचारबंदी अधिक जास्त कडक केली पाहिजे. उद्देश साध्य करायचा असेल तर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना पायबंद केले पाहिजे. त्यासाठी खासकरून किराणा दुकाने खुली ठेवण्यासाठी वेळ दिली पाहिजे. सकाळी ७ ते ११ अशाप्रकारे ४ चार किराणा दुकाने उघडी ठेवायला पाहिजे. परंतु याचा अर्थ दिवसभर किराणाच्या नावाखाली बाहेर पडत राहणं हे योग्य नाही. अशा पद्धतीची चर्चा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
‘ऑक्सिजन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. साडे बाराशे मॅट्रिक टनाचे स्वतःचे उत्पादन आपण १०० टक्के वापरत आहोत. परंतु त्याचबरोबर साधारणपणे तीनशे मॅट्रिक टन आपण बाहेरुन आणतोय. मग ते कळंबई, बिल्लारी, विशाखापट्टणम असो. आता आपल्या ट्रेन ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रोरो पद्धतीने म्हणजे ट्रक, टँकर ट्रेनवर चढवून ते त्यांच्या पद्धतीने आणण्याचे काम केले जात आहे. अशापद्धतीने ऑक्सिजन आणण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे दररोज तीनशे मॅट्रिक टन महाराष्ट्र मिळवतोय आणि तो आणतोय. म्हणजेच साडे बाराशे अधिक तीनशे म्हणजे पंधराशे मॅट्रिक टन दररोज ऑक्सिजन मिळते आहे. हे खूप मोठं कंज्मशन आहे. केंद्र सरकारने २० तारखेपर्यंत एवढा कोटा देऊन २५, ३० पर्यंत एवढा देऊ असे ठरवले आहे. त्यामुळे आपण अठराशे टनापर्यंत जाऊ शकतो. हा यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आजआपण साडे पंधराशेपर्यंत गेलेलो आहोत. पण कोरोनाबाधितांची संख्या अशाच प्रकारे वाढत राहिली तर ऑक्सिजनची पुढे समस्या होईल,’ असे राजेश टोपे म्हणाले.