मांजरखिंडीतील ग्रिन वाईल्ड व्हिला ठरतंय वाटसरूना आधार; अल्पावधीतच ठरतंय लोकप्रियतेला पात्र

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
राधानगरी पासून ३ किमी अंतरावर पूर्वेकडे व गैबी पासून पश्चिमेला ३ किमी अंतरावर मांजरखिंड येथे असलेले ग्रिन वाईल्ड व्हिला हे हॉटेल अनेक पर्यटकाना, खवय्यांना, आणि त्याच बरोबर येथील परिसराला आकर्षित करत आहे.एकेकाळी लुटमारी आणि भितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या निर्जन ठिकाणी चिट पाखरूही नसायचे त्याच ठिकाणी कुडूत्री (ता.राधानगरी)येथील युवा व सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौगले यांनी ग्रिन वाईल्ड व्हिला या प्रशस्त हॉटेलची उभारणी केल्याने अनेकांना हे ठिकाण आधार देत आहे.
नोकरीच्या मागे न धावता वयाच्या १५ व्या वर्षी पासून “कमवा व शिका” योजनेचा आदर्श घेऊन आपण स्वतः काहीतरी काम धंदा उभा करायचा अशी जिद्द मनाशी बाळगून प्रथम त्यांनी कोल्हापूर सारख्या ठिकाणी रायबा हॉटेलची निर्मिती केली.नुसता पैसे कमावणे हा त्या मागे उद्देश न्हवता तर त्यांना समाजसेवा जोपासायची होती. अंगी नेतृत्व गुण असून त्यांनी समाजकारणाला प्राधान्य दिले.आज त्यांनी आपल्या याच गुणाने ढिगभर माणसे मिळवली आहे. कोल्हापूर व गावपरिसरात त्यांनी अनेक गोर गरीब गरजूना सढळ हाताने मदत देखील केली आहे.
एखाद्या हॉटेलची निर्मिती करणे म्हणजे साधे – सुधे काम नसून यासाठी मुबलक असा पैसा खर्च करावा लागत असतो.एका हॉटेलच्या निर्मिती मागे त्यांनी दुसऱ्या हॉटेलची निर्मिती यशस्वी केली आहे.त्यामागे त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांचे बंधू साताप्पा चौगले यांचे मोठे योगदान आहे.व त्यांना कर्मचाऱ्यांची देखील मोठी साथ असून आपलेच हॉटेल समजून येथे ते काम करत आहे.
राधानगरी पर्यटन आणि कोकणात येणाऱ्या पर्यटकाना ग्रिन वाईल्ड व्हीला भुरळ घालत आहे. येथे जेवणासह चहा, नाष्टा,सोय तसेच वाटेवरून येणाऱ्या-जाणाऱ्या आणि तहानेने व्याकुळ झालेल्या वाटसरुना येथे पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.
मोठा आधार….
कोल्हापुरात चंद्रकांत चौगले यांचा मोठा आधार रुग्ण आणि नातेवाईक यांना मिळायचा. ते स्वतः रुग्णांना जेवणाचे डबे पुरवत असत. यामध्ये हा माझा-तुझा असा कधीच भेदभाव केला जात नसे.