ताज्या बातम्या

ग्रामविकास व कामगार मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमातून साजरा

गडहिंग्लज प्रतिनिधी (सोहेल मकानदार )

गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा मार्फत ग्रामविकास व कामगार मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांच्या ६७ वा वाढदिवस सेवाभावी उपक्रम घेवून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . कोरोना महामारीच्या काळामध्ये रक्तपेढ्यामध्ये रुग्णांना रक्ताची प्रचंड प्रमाणात टंचाई भासत आहे . रक्ताअभावी रूग्णांचा जीव जात आहे . यापार्श्वभूमीवर गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत पक्षकार्यालयामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले . रक्तदान शिबीराचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष मा.श्री . किरणराव कदम व मा.श्री . उदयराव जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . दिवसभरामध्ये 151 इतक्या कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले . तसेच गडहिंग्लज नगरपरिषद येथील स्वच्छता कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले . तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना एच.बी. व थॉयराईडची मोफत तपासणी करण्यात आली . आज रमजान चा महिना उपवास असताना तौफिक मुल्ला नाम. हसन मुश्रीफ यांच्या प्रेमापोटी यांनी रक्तदान केले . रक्तदान शिबीराचे वेळी मा.श्री . नाविद मुश्रीफ यांनी भेट दिली . रक्तदान शिबीराच्या वेळी वसंतराव यमगेकर , सुरेश कोळकी , महेश सलवादे , गुंडू पाटील , राजू जमादार , रश्मिराज देसाई , अमर मांगले , शर्मिली पोतदार , सिध्दार्थ बन्ने , रेश्मा कांबळे , उर्मिला जोशी , मंजूषा कदम , सुनिता नाईक , अरूणा कोलते , शबाना मकानदार , उज्वला कुंभार , शारदा आजरी , श्रेया कोणकेरी , स्वप्नील गुरव , बनश्री चौगुले , मनिषा तेली , डॉ . खोराटे , रफिक पटेल , धनाजी कळेकर , चंदू मेवेकर , विक्रांत पोवार , अरुण शिंदे , राकेश पाटील , अमर चव्हाण , जयकुमार मुन्नोळे , महाबळेश्वर चौगुले , महेश गाडवी , शिवप्रसाद तेली , अरुण मिरजे , जयसिंगराव चव्हाण , तानाजी शेंडगे , रामजी नावलगी , लक्ष्मण तोडकर , रामाप्पा करीगार , सहदेव कोकाटे , किरण शिंदे , सतिश थोरात , राजेश पाटील अभिजित पाटील , अवूधत रोटे इ . मान्यवर उपस्थित होते .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks