राज्याचे ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवस निमित्त गडहिंग्लज येते विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले

गडहिंग्लज प्रतिनिधी: सोहेल मकानदार
राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुष्यभर राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले आहे . विकास कामांबरोबरच त्यांनी जपलेला सेवाभावही तितकाच उत्तुंग आहे.नाम हसन मुश्रीफ यांच्या आज 67 वा वाढदिवस. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढदिवसानिमित्त गडहिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम रबिवण्यात आले. कोरोना महामारी मुळे राज्यात रक्तपेढ्यामधून रुग्णांना रक्ताची टंचाई भासत आहे रक्ताअभावी रुग्णांचा जीव जात आहे या पार्श्वभूमीवर आज पक्षाच्या कार्यालयात भव्य रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते त्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाले.तसेच गडहिंग्लज नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क व सानिटीझर वाटप करण्यात आले.तसेच एच बी व थॉराईडची तपासची करण्यात आली .यावेळी वसंत येमगेकर,गुंडू पाटील, महेश सलवादे,अमर मां गले, राजू जमादार, रफिक पटेल,सुरेश कोळकी,रश्मीराज देसाई,सिद्धार्थ बन्ने, सुनील चौगुले,अमर चव्हाण, विक्रांत पोवार,उदय जोशी,मंजुषा कदम,सुनीता नाईक,मनीषा तेली,शबाना मकानदार,उर्मिला जोशी,शारदा आजरी,अरुणा कोलते आदी उपस्थित होते.