गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी मिळून लढू, असे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले

कोल्हापूर प्रतिनिधी :
जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळ दूध संघाची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकी संदर्भात संचालक मंडळाच्यावतीने उच्चन्यायालयात दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्र बिंदू असलेल्या गोकुळ मध्ये लगबगिला सुरवात झाली आहे. दरम्यान, गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी मिळून लढू, असे संकेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.
गोकुळ निवडणूक लवकरच, महाविकास आघाडी मिळून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न – हसन मुश्रीफअंतिम मतदार यादी प्रसिद्ध -प्राधिकृत अधिकारी डॉक्टर गजेंद्र देशमुख यांनी तीन हजार ६५६ सभासदांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराच्या आदेशानुसार निवडणूक ३१ मार्चपर्यंत स्थगित करावी, अशी मागणी गोकुळच्यावतीने केली होती. यावर मंगळवार सुनावणी होवून न्यायालयाने गोकुळची मागणी अमान्यकेली होती. त्यानंतर पुन्हा नव्याने याचिका दाखल करण्यात आली होती. ही सुनावणी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती.महाविकासआघाडी एकत्र येण्यासाठी प्रयत्न -मुंबई उच्च न्यायालयाने गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू ठेवा असे आदेश दिल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडणूकीत महाविकासआघाडी एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यातील गोकुळ दूध संस्था महत्त्वाची आहे. ही निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली व्हावी म्हणून पालकमंत्री सतेज पाटील आमदार पी. एन. पाटील व माझ्यात दोन वेळा बैठक झाली. आम्ही फक्त न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबलो होतो. आता पुन्हा आम्ही एकत्रित येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे त्यांनी सांगितले.बिनविरोधचा दावा त्यांनी फेटाळून लावला सहकारी संस्थेमध्ये सर्वांना संधी हवी असते. महाडीकांना शह देण्याचा प्रयत्न येतच नाही. त्यामुळे या निवडणुका शक्यतो बिनविरोध होत नाहीत असे सांगितले.