ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुळची उमेदवारी राजे गटास मिळालीच पाहिजे ठराव धारक कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम ठरावधारकांचा समरजितसिंह घाटगे यांचेवर मोठा दबाव.

कागल, प्रतिनिधी

होऊ घातलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढ आघाडी कडून राजे गटास उमेदवारी मिळालीच पाहिजे.अन्यथा या निवडणुकीपुरता आम्हाला आमचा मार्ग मोकळा करा.असा एकमुखी सूर व तीव्र भावना राजे गटाच्या ठरावधारक कार्यकर्त्यांनी आपले नेते समरजितसिंह घाटगे यांच्यासमोर व्यक्त केल्या.

गोकुळच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर श्री घाटगे यांनी ठराव धारकांचा मेळावा घेतला. त्यामध्ये अनेक ठरावधारकानी आक्रमक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.या मेळाव्यास कागल, करवीर तालुक्यातसह जिल्ह्यातील दिडशेहेहुन अधिक ठराव धारक उपस्थित होते.कोणत्याही परिस्थितीत राजे गटास उमेदवारी घेण्याबाबत कार्यकर्ते ठाम राहिले . काहीनी तर आक्रमक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी आक्रमक कार्यकर्त्यांना समजवण्याचा श्री. घाटगे यांनी प्रयत्न केला, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

आपल्या स्वागत व प्रास्तविकपर मनोगतात शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे म्हणाले, राजे गटाच्या सहा एप्रिलच्या मेळाव्यात ठरलेप्रमाणे दूध संघाच्या निवडणुकीमध्ये राजे गटास प्रतिनिधित्व मिळणेबाबत आपल्या सगळ्यांच्या भावना वरिष्ठ नेते मंडळीँकडे पोहचविण्यात आल्या आहेत. याबाबत ते निश्चितच सकारात्मकपणे विचार करतील.आघाडीचे प्रमुख नेते महादेवराव महाडिक यांनी आपले नेते राजे समरजितसिंह घाटगे यांची काल भेट घेऊन याबाबत चर्चा करून निर्णय कळवत असल्याचे सांगितले आहे. राजे गटाच्या उमेदवारीबाबत अद्याप कोणताही ठोस शब्द मिळालेला नाही. आपल्या गटाला जर कुणी गृहीत धरत असेल तर ते कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. आपल्या गटास प्रतिनिधित्व मिळत नसेल तर वेगळा विचार करावा. अशी भूमिका कार्यकर्त्यांनी याआधीच मांडली आहे.आजही त्याच भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम आहोत. आमच्या कार्यकर्त्यांची सातत्याने कुचंबणा होते. मान सन्मान मिळत नाही.यामुळे गटाचे खच्चीकरण होत आहे. त्यामुळे राजेसाहेब आपल्याला विनंती आहे की आपण या वेळी कार्यकर्त्यांच्या वर दबाव टाकू नका.ते अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीत.

राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील म्हणाले, आजपर्यंत जिल्ह्याच्या राजकारणात स्व.राजेविक्रमसिंहजी घाटगे यांनी शब्द पाळणारा गट अशी प्रतिमा तयार केली आहे. तीच परंपरा राजे समरजितसिंह घाटगे पुढे चालवित आहेत. मात्र गोकुळच्या निवडणुकीमध्ये राजे गटावर सातत्याने उमेदवाराच्या बाबतीत अन्याय होत आला आहे. राजे गटाच्या ठराव धारकांची उमेदवारीची मागणी रास्त आहे. त्याला आघाडीच्या नेते मंडळींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळावा. अशी अपेक्षा आहे.

यावेळी सुनीलराज सूर्यवंशी म्हणाले,जिल्ह्याच्या राजकारणामध्ये राजे गटाला वगळून कुणालाही यशस्वी राजकारण करता येणार नाही. स्व.विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या सहकारातील आदर्श विचारांचा वारसा आमचे नेते राजे समरजितसिंह घाटगे समर्थपणे पुढे चालवीत आहेत.गोकुळची या वेळची निवडणूक अटीतटीची होत आहे. त्यामुळे काठावर असलेल्या या निवडणुकीमध्ये राजे गटाकडे निकालाचे पारडे फिरविण्याइतके संख्याबळ आहे. मात्र सत्ताधारी मंडळी आमच्या गटाला गृहीत धरत आहेत. आमच्यापेक्षा कमी ताकतीच्या गटांना प्रतिनिधित्व मिळत आहे. त्यामुळे सत्तारूढ आघाडीच्या नेत्यांना राजे गटाची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे.उमेदवारी मिळत नसल्यास याआधी आम्ही जाहीर केल्याप्रमाणे बंड अटळ आहे.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील, म्हणाले,सत्ताधारी मंडळी आम्हाला जमत धरीत नसतील तर आम्हाला आम्ही आमचा मार्ग निवडू.

आभार शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी मानले.

 

प्रा.सुनील मगदूम म्हणाले, कार्यकर्त्यांचा आग्रह असूनसुद्धा आमचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी वैयक्तिक स्वतःचा किंवा पत्नी सौ नवोदिता घाटगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही कारण स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांचे संस्कार त्यांचेवर आहेत. त्यामुळे त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे ठरविलेले आहे. त्यांच्या या आदर्शाचा सन्मान सत्तारूढ आघाडीने राजे गटास उमेदवारी देऊन करावा. राजे गटास प्रतिनिधित्व मिळाले नाही तर राजे गटाचे इच्छुक उमेदवार माघारी घेण्याच्या मानसिकतेत नाहीत. राजसाहेब आपण आमचे नेते आहात. आपला आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे. मात्र या निवडणुकीपुरते आम्हाला माफ करा. जर आपल्या गटास उमेदवारी मिळाली नाही तर लढाई आमच्यासाठी नविन नाही जर आमच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळाली नाही तर आपण सांगितले तरीही माझी उमेदवारी मागे घेणार नाही.

…. तर आम्हाला मोकळीक द्या.

नागाव तालुका करवीर येथील ठराव धारक संजय नाईक म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्यातील स्नुषा असलेल्या सौ नवोदिता घाटगे यांना उमेदवारी मिळेल या अपेक्षेने आम्ही दक्षिण मधील राजकारण बाजूला ठेवून राजेच्या भूमिके सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आजही आम्ही त्यावर ठाम आहोत.
राजेंनी सर्वसामान्य कार्यकर्ते याना संधी मिळावी म्हणून मोठ्या मनाने वाहिणीसाहेब याना बाजूला ठेवले आहे.तरीही राजे गटाला प्रतिनिधित्व मिळत नसल्यास आम्हाला मोकळीक द्या अशी विनंती केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks