गोकुळच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान देणार….अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी संचालक रणजितसिंह पाटील यांची ग्वाही.

प्रकाश पाटील / भुदरगड प्रतिनिधी
गोकुळ कारभाराचा व तिथल्या राजकारणाचा भुतकाळ विसरून आता सर्वांनी मिळून गोकुळ संघाचा निकोप,सक्षम कारभार करुन गोकूळ अमूल ब्रॅंड बरोबर स्पर्धा केरल
असा विश्वास नुतन संचालक रणजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. मुदाळ ता.भुदरगड येथे मा.आमदार के.पी.पाटील यांचे आभार मानण्यासाठी संघाचे नुतन अध्यक्ष विश्वास पाटील आबाजी आले असताना सदिच्छा भेटीत बोलत होते.
यावेळी अध्यक्ष विश्वास पाटील बोलताना म्हणाले मी गेली ३५ वर्षे संघात विश्वस्त म्हणून काम करत आहे. अनूचित मुद्याना, निर्णयाना विरोध केल्याने गोकूळमध्ये परिवर्तंन घडले.हेच परिवर्तन उद्याच्या श्वेतक्रांतीला पूरक ठरेल. रणजित पाटील यांच्यासारखे उच्चशिक्षीत व सहकार,शैक्षाणिक क्षेत्रात अमुल्य जडणघडण असणारे युवा संचालक लाभले आहेत.गोकुळचा सुमारे आठराशे कोटीपेक्षा अधिक टर्नओव्हर असलेला कारभार आपल्या निवडीने सार्थ ठरवतील असा विश्वास व्यक्त केला. सदिच्छा भेटी प्रसंगी अध्यक्ष म्हणून निवडीबद्दल विश्वास पाटील यांचा सत्कार मा.आम.के.पी.पाटील यांनी केला. यावेळी मा.आम. के.पी.पाटील म्हणाले जिल्हयातील दूध उत्पादक घटकावरच संघाची प्रगती होणार आहे. हा घटकच संघाचा खरा मालक असून तुमच्यावर व्यक्त केलेला विश्वास हा विश्वस्ताच्या नात्याचा आहे. उत्पादक घटक केंद्रबिंदू माणून गोकूळचा सहकार सर्वासमोर आदर्शवत ठरेल.अशा कारभाराबद्दल आशावाद व्यक्त केला.
यावेळी बिद्री संचालक मधुआप्पा देसाई, के.ना.पाटील पं.स.सदस्य संग्राम देसाई, बापूसो आरडे, विकासराव पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थीत होते.