ताज्या बातम्या

गोकुळमधल्या यशामागे विजयाचे शिल्पकार आपण आहात संचालक रणजितसिंह पाटील यांची भावनिक हाक..

प्रकाश पाटील/ भूदरगड प्रतिनिधी.

        जिल्हयात अटीतटीच्या ठरलेल्या गोकुळ निवडणूकीत मला मिळालेले दैदिप्यमान यश या यशाचे खरे शिल्पकार आपण सर्वच जण असून मी निमित्यमात्र आहे.मी नावांने संचालक झालो असलो तरी आपण सर्वचजण संचालक आहात या भावनेने मी गोकुळच्या कार्यात रहाणार असल्याचे भावनिक मत गोकुळ विजयी उमेदवार रणाजितसिंह पाटील यांनी मुदाळ येथे निकालानंतर सर्वांचे आभार मानताना व्यक्त केले.

     यावेळी ते पुढे म्हणाले माझ्या विजयात आपल्या सारख्या कार्यकर्तानी दिलेले योगदान मोलाचे ठरले म्हणूनच हा विजयाचा टप्पा पार करु शकलो. कोरोणासारखी महामारी असताना आपण सर्वानी अपार कष्ट घेतले.हे व्यक्त करण्यासाठी आपलेकडे शब्दच नाहीत. जिल्हयातील दूध उत्पादकाच्या गाई गोठयातील कष्टकरी हाताला आर्थिक उन्नती लाभण्याचे दृष्टीने आपण प्रयत्नशील रहाणार असून मी तुमच्याबरोबर तुम्ही माझ्याबरोबर ही संकल्पना घेवून आपण पूढे जाणार असल्याचे नमूद केले.

     यावेळी मा.आमदार के.पी.पाटील बोलताना म्हणाले जिल्हयातील दूध उत्पादक घटकातला श्रमजीवी घटक असलेला दूध उत्पादक शेतकरी याचे जीवनमान उंचावण्याची संधी या विजयाने मिळाली आहे.सहकार काय असतं कसं चालवलं जातं याचा अभ्यास असलेल्या रणजितदादा गोकुळमध्ये गौरवशाली काम करतील असा अशावाद व्यक्त केला.या रणधुमाळीत काम केलेल्या सर्वाचे अभार त्यांनी मानले. यावेळी रणजितसिहं पाटील यांचे जंगी स्वागत,मिरवणूक काढणेत आली प्रसंगी गुलाल,फटाक्याची आतषबाजी करणेत आली. यावेळी विश्वनाथ कुंभार,बापूसो आरडे, मधुआपा देसाई,बाळकाका देसाई,सुनिल कांबळे,के.ना.पाटील,आर.व्ही.देसाई,विठ्ठलराव कांबळे,दत्तात्रय पाटील,संग्राम देसाई संतोष मेंगाणे,बाळ जाधव विकास पाटील विजय गुरव आदीसह युवक कार्यकर्ते उपास्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks