बांधकाम कामगारांना पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्या : महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना

कोल्हापूर :
नोंदित बांधकाम कामगारांना दिवाळी करीता पंधरा हजार सानुग्रह अनुदान द्या या मागणीचे निवेदन सहायक कामगार आयुक्त मा. वी. वी. घोडके यांना आज महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज शिष्टमंडळ देण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने अनेक नागरिकांनी बांधकामे काढणेचे थांबवले आहे. खास करून ग्रामीण भागातील बांधकाम रखडलेली दिसून येत आहेत यामुळे बांधकाम कामगारांना काम मिळत नाही. कामगारांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. यामुळे यावर्षी दिवाळी करिता बांधकाम कामगारांना १५ हजार सानुग्रह अनुदान देऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानी कामगारांची दिवाळी करणेस मदत करावी अशीही मागणी शिष्ठ मंडळात करणेत आली.
यावेळी कामगार नेते कॉ. आनंदा गुरव, धनाजी गुरव, रघुनाथ मरेने, रविंद्र जाधव, दिनकर लोहार रघुनाथ देशींगे आदि शिष्टमंडळा उपस्थित होते.