ताज्या बातम्या

गिजवणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओढ्याचे सुशोभीकरण करावे-मनसे विद्यार्थी सेनेची मागणी

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार

गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ओढ्याचे सुशोभीकरण करावे या मागणीसाठी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे यांनी गिजवणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की,गडहिंग्लज तालुक्यातील सीमेलगत असणारे गिजवणे हे गाव याच गावातून अनेक राजकीय उलथापालथी होत असल्यामुळे ते गडहिंग्लज तालुक्यातील प्रमुख सत्तेचे केंद्र मानले जाते . नुकतीच झालेली गिजवणे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून संपूर्ण महाराष्ट्राला या गावाने नवीन आदर्श घालून दिला होता . गिजवणे गावाला 2001 साली जिल्हा परिषदेकडून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारांने गौरविण्यात आले होते . गडहिंग्लज कडून गिजवणे गावात प्रवेश करताना एक ओढा लागतो . कोकण तसेच गोव्याकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्यामुळे सदर रस्त्यावर वाहतुकीची नेहमीच वर्दळ असते . गिजवणे हद्दीतील ओढ्या कडेला असलेल्या रिकामी जागेत घाणीचे साम्राज्य पसरले असून लोकांना ये – जा करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे . परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . घाणीच्या साम्राज्यामुळे मोकाट भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून कुत्र्यांच्या वर्दळीमुळे दुचाकी घसरून अपघात होऊन गंभीर स्वरूपात इजा झाल्याचे प्रकार घडले आहेत . सदर ओढा अरुंद असल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे . गिजवणे गावातील बहुतेक नागरिक व्यापार तसेच इतर शासकीय कामासाठी गडहिंग्लज शहरात येत असतात . या नागरिकांना रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची दिवाबत्तीची सोय नसल्यामुळे ये – जा करतेवेळी अंधारातून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते . गिजवने हद्दीतील दोन्ही ओढ्यांचे रुंदीकरण करून त्या परिसरात दिवाबत्तीची सोय करावी . तसेच सदर जागेत नागरिकांसाठी व महिलांसाठी नगरपालिकेच्या धर्तीवर ओपन जिमची निर्मिती करावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks