घुणकी पूर परिस्थिती पूर्वपदावर ! यंत्रणेचे कौतुक, मात्र पुनर्वसन हाच पर्याय !

घुणकी प्रतिनिधी : सचिन कांबळे
कोल्हापूरची पंचगंगा व वारणा नदीला महापूर आल्याने या पुराचा फटका नदी काठच्या सर्व गावांना बसला होता. त्यामुळे गावातील दलित नागरी वस्तीत पुराचे पाणी शिरले होते.आणि तातडीने येथील नागरिकांनी स्थलांतरित केले पाहिजे हे लक्षात येताच ग्राम प्रशासन यांनी येथील सर्व नागरिकांना तत्काळ मराठी शाळेत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केलेली होती. मात्र आता पूर परिस्थितीत पूर्वपदावर येत आहे. आणि लोक आप आपल्या घरी परतत आहेत. तत्पूर्वी सर्व यंत्रणा लावून त्या ठिकाणी औषध फवारणी आणि लाईटची पुन्हा व्यवस्था निर्माण केली आहे.
पुरात माणुसकीचा महापूर !
पूरग्रस्तांना मराठी शाळेत काही स्वयंम सेवा भावी सस्था माणुसकीच्या नात्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन या पूरग्रस्त नागरिकांना धीर आणि आधार दिला. यामध्ये भरारी महिला बहुउद्देशीय सेवा भावी संस्था,मल्हार सेनेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे ( शरदचंद्र पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष शहाजी सिद, कुमार पाटोळे, आण्णा पाटोळे, ऋषिकेश मठपती यांनी पूरग्रस्तांना अन्नदाता म्हणून चांगली भूमिका बजावली, लहान मुलांना खाऊ वाटप केला तसेच तसेच स्थानिक लोकप्रतिनधींनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचे आणि तत्काळ उर्वरित (रेड पट्टा) लाल पूर रेषेत असणाऱ्या नागरिकांचे त्वरित पुनर्वसन व त्यास आवश्यक असणारा कागदपत्रांची पूर्तता लवकर करून ध्या आम्ही त्याच आधारे आम्ही शासनाकडे केंद्र सरकारकडे देखील मांडणी करून लवकर ठोस निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर पुनर्वसन करू असे आश्वासन दिले. यामध्ये प्रामुख्याने नवनियुक्त खासदार धैर्यशील माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव माने, आमदार राजुबाबा आवळे, माजी आमदार गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ सुजित मिणचेकर होते. त्याच बरोबर प्रशासकीय अधिकारी यांची देखील समर्थन मिळत आहे. यामध्ये हातकणंगले तहसीलदार महेश खीलारी, अप्पर तहसीलदार सौ कल्पना ढाकळे, स्थानिक प्रशासन ग्रामसेवक विजयकुमार पाटील, तलाठी प्रदीप काळे, यांनी देखील त्या अनुषगाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत, तसेच गावातील पुराचे नियंत्रण, लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी वारणा दूध संघाचे संचालक राजवर्धन मोहिते, वारणा कारखाना संचालक सुभाष जाधव, स्थानिक ग्रामपंचायत कर्मचारी वरिष्ठ लिपिक प्रदीप मोहिते, संगणक ऑपरेटर श्रीकांत मोहिते, शिपाई कृष्णात, पाणी पुरवठा अनिल व दिनकर यांनी खूप कौतुकास्पद काम केले आहे.स्थानिक ग्रामपंचायत सरपंच सौ सुजाता जाधव, उपसरपंच केशव कुरणे सर्व ग्राम सदस्य यांनी देखील सर्व पूरग्रस्त नागरिक यांची मनापासून मानवतेच्या दृष्टिकोनातून सेवा केली.
पूरग्रस्त नागरिकांनी देखील सर्वांचे आभार मानले आणि आमचे प्रत्येक वर्षी या पुरामुळे होणारे आर्थिक नुकसान आणि होणार त्रास कमी व्हावा आणि त्यासाठी पुनर्वसन एकमेव पर्याय आहे.तरी सर्व ग्राम पंचायत आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य करावे अशी विनंती केली. आता पूर ओसरत आहे आणि ही पूर परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. तसेच पूर येऊन गेल्यानंतर जो आरोग्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.त्यामुळे येथून पुढे होणाऱ्या रोगाराईला कशा प्रकारे आपण सामोरे जाण्यासाठी आरोग्याची काळजी स्थानिक आरोग्य केंद्र तेथील सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ ज्योती शिंदे,आरोग्य सेविका सौ सुजाता काटकर, आरोग्य सेवक विजय माने यांनी देखील मराठी शाळेत पूरग्रस्त नागरिकांना भेट देऊन सर्वांची तपासणी केल्या यामध्ये अशा स्वयंसेविका यांनी देखील खूप सहकार्य केलं आहे.