ताज्या बातम्या

मुदाळच्या रणजितदादा युवाशक्ती १०० बेडचे जम्बो कोविड सेंटर  लोकोपयोगी! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ मुदाळ मध्ये रणजितदादा युवा शक्तीच्या 100 बेडच्या मोफत कोविड सेंटरचे लोकार्पण

मुदाळ प्रतिनिधी 

मुदाळ ता. भुदरगड येथे रणजीत दादा पाटील युवाशक्तीच्या 100 बेडच्या मोफत कोविड सेंटरचे लोकार्पण झाले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील या प्रमुखांसह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या कोविड सेंटरला औषध पुरवठ्यासह सर्वच पातळ्यांवर सर्वतोपरी सहकार्य करू. नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन कडून एक लाख रुपयांची मदतही यावेळी जाहीर केली.

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा लोकसेवा आणि ऋग्णसेवा या क्षेत्रातील अनुनय घेऊनच या सेवाभावी उपक्रम सुरू केला आहे. 

गोकुळ दूध संघाचे नूतन संचालक रणजितसिंह पाटील म्हणाले, कोरोना बाधितांना आपल्या घरातील वाटावं असं वातावरण या ठिकाणी निर्माण केलं आहे. कोणतेही औषधोपचार कमी पडू देणार नाही आणि रूग्ण बरा होऊन आनंदाने घरी जाईल याची सर्वतोपरी काळजी घेऊ. 

यावेळी प्रमुख अधिकारी संपत खिल्लारी, गणपतराव फराकटे, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, धैर्यशील पाटील, पंडितराव केणे, गटविकास अधिकारी सरिता पवार, तहसीलदार अश्विनी वरोटे- आडसूळ, उमेश भोईटे, प्रवीण भोसले, दत्ता पाटील -केनवडेकर, विकास पाटील -कुरुकलीकर, राजेंद्र पाटील तालुक्यातील लोकप्रतिनिधी अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks