गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
गांधीनगर : उघड्यावर बेकायदेशीर दारूविक्री ; एकावर गुन्हा दाखल

गांधीनगर प्रतिनिधी :
गांधीनगर (ता. करवीर) येथे उघड्यावर गोवा बनावटीची दारूविक्री केल्याबद्दल सुनील मेगोमल लुलानी (वय 49, रा. गांधिनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली असून रोख 420 रुपयांसह तीन हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस हवालदार कृष्णात पिंगळे यांनी याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून लुलानी याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पथकामध्ये सहाय्यक फौजदार अजय गोडबोले, हवालदार सुनील कवठेकर, गुलाब चौगुले, तुकाराम राजीगरे यांचा समावेश होता.