गडहिंग्लज : परीक्षा चुकल्याच्या नैराश्यातून तरुणीची गळपास घेऊन आत्महत्या
गडहिंग्लज प्रतिनिधी :
गडहिंग्लज येथील प्रसिद्ध व्यापारी रामगोंडा पाटील यांची मुलगी मधूजा रामगोंडा पाटील (वय-१९) हीने आज (शुक्रवारी) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.१२ वीचे पूर्व परीक्षेचे पेपर न दिलेमुळे ती नैराश्यात होती त्याच नैराश्यातून तिने आत्महत्या केली असल्याची काका महादेव पाटील यांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की आज दुपारी २.३० च्या दरम्यान मधूजा हिने घरांचांच्या सोबत जेवण केले. तिला काका महादेव यांनी पेपर चुकले बाबत तू चिंता करू नको अशी समजूत काढली. त्यांनतर मधूजा आपल्या बेडरूममध्ये गेली. त्यावेळी घरची लोक कामात व्यस्त होते. थोड्या वेळात मुलीचे काका महादेव पाटील वरच्या मजल्यावर रुमजवळ गेले असता बेडरूम बंद दिसली म्हणून तिला हाक मारली पण मधूजा हिचा काही प्रतिसाद मिळत नसल्याने काका यांनी दार तोडून आत गेले.त्यावेळी छताच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेतलेली मधूजा दिसली तिला तत्काळ खाजगी दवाखान्याकडे नेण्यात आले.पण ती उपचारापूर्वी तिचे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले.मधूजा साधना ज्युनिअर कॉलेजमध्ये १२ वी कॉमर्समध्ये शिकत होती.मधूजा हिचा स्वभाव प्रेमळ असल्याने तिचा मित्रपरिवार खूप होता तिच्या जाणांने मित्रपरीवारावर तसेच घरांच्यावर शोककळा पसरली असून उपजिल्हारुग्णालया ठिकाणी गर्दी होती.अधिक तपास हेडकॉन्स्टेबल रवी शिंदे करीत आहेत.