गडहिंग्लज शहरातील हॉल व मंगलकार्यालय ताब्यात घ्या- गडहिंग्लज शिवसेना उपशहर प्रमुख काशीनाथ गडकरी

गडहिंग्लज:-(सोहेल मकानदार)
मागील आठवड्यामध्ये पुण्या-मुंबईतुन काही नागरिक गडहिंग्लज तालुक्यासह शहरात स्थलांतरित झाले आहेत.
त्यांची रॅपिड टेस्ट केल्यावर कोरोना पोसिटीव्ह पेशन्ट सापडले.त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार केंद्र चालू केले.
परुंतु बिघडत चाललेली परिस्थिती पाहता दिवसा गणिक रुग्णांची वाढ होतच चालली आहे. त्यामुळे तिकडे जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे इथून पुढची परिस्थिती पाहता बेड अभावी रुग्णाची गैरसोय होण्याची आणि जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यासाठी शहरातील सर्व मंगलकार्यालय व हॉल आताच ताब्यात घेऊन होणारी गैरसोय टाळावी आणि बाधित रुग्णांना योग्य ते उपचार सुरू करावे असे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी कोरोना संसर्गजन्य परिस्थिती मुळे निवेदन टपाल सेवे द्वारे पाठवण्यात आले.
यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख काशीनाथ गडकरी, राजू मांगुरे, प्रकाश पाटील, नितीन सुतार इत्यादी उपस्थित होते.