कासारी धरणापासून ते यवलूज कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी

कोल्हापूर, : रोहन भिऊंगडे
कासारी नदीवरील कासारी धरणापासून ते यवलूज कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंत उपसाबंदी लागू केली आहे. उन्हाळी हंगाम 2020-21 मधील कालावधीत दिनांक 15ते 18 एप्रिल पर्यंत उपसाबंदी लागू करण्यात आल्याचे कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तरचे) कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी कळविले आहे.
कासारी धरणापासून ते यवलूज कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या कासारी नदीवरील दोन्ही तीरावरील भागात दिनांक 15ते 18 एप्रिल पर्यंत उपसाबंदी लागू केली आहे. उपसाबंदी ही शेतीसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारी नदीवरील सोलर पंपांनाही लागू राहील. नदीवरील सोलर पंप धारकांनी उपसाबंदी कालावधीत त्यांचे उपसायंत्र बंद ठेवायचे आहे. उपसाबंदी कालावधीत पंप चालू असल्याचे आढळल्यास किंवा उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करुन परवाना धारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही, असेही त्यांनी कळविले आहे.