वाघोत्रे घाटात पाऊणे चार लाखाचा माल जप्त : चंदगड पोलिसांची कारवाई.

चंदगड प्रतिनिधी : नंदकिशोर गावडे
चंदगड पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्या विरूद्ध कारवाई या मोहिमे अंतर्गत गोवा राज्यातून येणाऱ्या बेकायदेशीर दारूच्या वाहतुकीवर चंदगड पोलिसांनी कारवाई केली.इसापूर -पारगड -मोटणवाडी आणि तिलारी येथे अचानक सापळा लावण्यात आला होता.रात्री 02.00 वा.च्या सुमारास पारगड कडून एक संशयित महिंद्रा पिकप बोलेरो गाडीला मोटरसायकल वरून दोन इसम पायलेटिंग करत येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तेव्हा तेथील HC 2162 नांगरे व त्यांची टीम यांनी सदर गाडीचा पाठलाग सुरू केला परंतु गाडी वाघोत्रेच्या जंगलामध्ये अंधाराचा फायदा घेऊन नाहीशी झाली.तेव्हा लागलीच पुढे मोटनवाडी फाटा येथे दुसऱ्या टीमला कळवून पायलेट इन करत असले मोटरसायकल स्वरास पाठलाग करून अत्यंत शिताफीने पकडण्यात आले.त्यांना पकडून त्यांच्याकडील मोबाईल ताब्यात घेऊन वाघोत्रे जंगलात नाहीश्या झालेल्या गाडीचा शोध सुरू केला पहाटे 05.00 वा. संशयित गाडी वाघोत्रे जंगलात मिळून आली. त्यावरील चालक व साथीदार यांना पकडून ताब्यात घेतले सदरच्या गाडीची पाहणी केली असता त्यात गोवा बनावटीची दारू तसेच काजू फिनिची तयार दारू असा गोवा बनावटीची एकूण 97,122रुपयांची दारू तर अडीच लाखाची बुलेरो आणि फस्तीस हजारांची टू व्हीलर असा एकूण तीन लाख 82 हजारांचा माल जप्त केला.तरी वरील वर्णाचा माल हा आरोपी क्र.1) कृष्णा बसवंत नाईक2) सुनील कल्लाप्पा पाटील3) नागेंद्र नारायण पाटील4) विठ्ठल हनुमंत पाटील सर्व रा. बहादुरवाडी ता.जि. बेळगाव(कर्नाटक)यांचे कडून मिळून आला आहे.चंदगड पोलिस ठाण्यात 176/2021 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)( ई ), ९०,१०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही ही मा. अपर पोलीस अधीक्षक गायकवाड मॅडम, गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजी व उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग श्री गणेश इंगळे सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांचे सोबत परि. पोसई कारंडे,ASI पाटील, ASI कंगराळकर,HC 2162 नांगरे,PN 1532 किल्लेदार, पोकॉ.736 आष्टेकर, पोकॉ.889पाटील, पोकॉ.314 कांबळे, पोकॉ 2137 सोनूले ,होमगार्ड कांबळे हे होते. सदर प्रकरणी सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल 2162 नांगरे हे करत आहेत.