गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

माद्याळातील धुमधडाक्यात लग्न प्रकरणी वधू वर पित्या सह चौघावर गुन्हा ; मुरगूड पोलिसांची कारवाई

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

माद्याळ (ता कागल ) येथे कोरोना प्रतिबंध करण्यासाठी राज्यात पुकारलेल्या संचारबंदीचे उल्लंघन करून धुमधडाक्यात लग्न करणाऱ्या वधूवर पित्यासह अन्य दोघे अशा चौघावर मुरगूड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.अज्ञात व्यक्तीने फोन वरून माद्याळ मध्ये धूमधडाक्यात लग्न सुरू असल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने कारवाई केली.विशेष म्हणजे लग्न सुरू असणाऱ्या गल्लीच्या शेजारील गल्लीत सात कोरोना रुग्ण सापडले असताना हे लग्न सुरू होते.
माद्याळ ( ता कागल ) येथील प्रकाश बंडू भिऊगडे यांनी आपल्या दोन्ही मुलांची लग्ने गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील जोतिबा श्रीपती नलगे यांच्या दोन्ही मुलीशी ठरवली होती. दरम्यान संपूर्ण राज्यात १४४ कलम लागू केल्याने लग्न समारंभासाठी ग्रामपंचायत व पोलीस स्टेशन ची परवानगी घेऊन पंचवीस लोकांच्या उपस्थित लग्न पार पाडणे गरजेचे होते.
तथापि भिऊगडे यांनी कोणतीच परवानगी न घेता पंचवीस पेक्षा जास्त लोकांना एकत्रित करून लग्न समारंभ करण्यास सुरवात केली होती.याबाबत माद्याळमध्ये धुमधडाक्यात लग्न सुरू आहे . असा निनावी फोन मुरगूड पोलिसांना आला.त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस कर्मचारी स्वप्नील मोरे, सुदर्शन पाटील , ग्रामसेवक कुंभार, पोलीस पाटील मदन संकपाळ आदीनी माद्याळ येथे जाऊन ग्रामपंचायत प्रशासनाला बरोबर घेऊन घटनास्थळी भेट दिली.
यावेळी नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसल्याने पोलिसांनी वर पिता प्रकाश बंडू भिऊगडे (रा माद्याळ ),वधू पिता जोतिबा श्रीपती नलगे (रा कडगाव ता गडहिंग्लज ) ,लग्न कार्यात सहकार्य करणारे शरद महादेव भिऊगडे ( रा कडगाव ),व आंनदा लग्न कार्यात सहकार्य करणारे शरद महादेव भिऊगडे ( रा कडगाव ),व आंनदा मारुती नागरे (रा हणीमनमाळ ता गडहिंग्लज ) या चौघावर गुन्हा नोंद केला. याबाबत ग्रामपंचायत शिपाई बबन बाळासो गरड यांनी फिर्याद दिली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks