कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप शिवनारायण झंवर यांचे वृद्धापकाळाने निधन

कोल्हापूर :
कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योजक रामप्रताप शिवनारायण झंवर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.श्रीराम फौंड्रीच्या माध्यमातून त्यांनी कोल्हापूरच्या उद्योगाचे वैभव वाढविले. त्यांनी २००० ते २००७ या कालावधीत कोल्हापूर इंजिनअीरिंग असोसिएशनचे अध्यक्षपद काम करताना कोल्हापूरच्या उद्योगक्षेत्राच्या कक्षा उंचाविण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे ते सलग सात वर्षे अध्यक्ष होते. फाउंड्री क्लस्टर योजना अंमलात आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. औद्योगिक क्षेत्रातील एक चालता-बोलता इतिहास होते, अनेकांना त्यांनी उद्योगांमधील अडचणीवर मात कशी करायची याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले आणि अनेक उद्योजक निर्माण केले सामाजिक क्षेत्रांमधील त्यांचे कार्य अतुलनीय असून एक दानशूर व्यक्ती म्हणून त्यांचे समाजात मोठे नाव होते.